Marathi Sangrah

20 Sep, 2009

पुणेरी शिष्टाचार

Filed under: Uncategorized — marathisangrah @ 12:20 pm

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते . म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे . काही उदाहरणे देत आहोत ..

 

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks

…………… रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही . कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls

………. ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे . तुमच्या गप्पांसाठी नाही

 

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first

…………….. ही लिफ़्ट आहे . लोकल ट्रेन नाही . सुटली तरी चालेल ..

 

Please don’t use the same elevator in case the same is being used by an associate along with client

…………… ग्राहक देवो भव . तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो . कंपनी खिशातून काही देत नाही .

 

Avoid speaking in regional languages within the office premises

………….. गावच्या गप्पा घरी !

 

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for

…………… ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत . जर तुम्ही चैतन्य काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका . ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत . गुमान बूड त्याच्यातच विझवा . ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही ..

 

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office

…………. शांतता राखा . हे ऑफ़िस आहे . तमाशाचा फ़ड नाही .

 

Please keep a check on the noise levels in the pantries

………… संयमाने आणि हळू बोला . आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत .

सोडून द्या त्या कसाबला

Filed under: Uncategorized — marathisangrah @ 12:05 pm

सोडून द्या त्या कसाबला
तो अजून अंजान, निरागस आहे.
अजाणतेपणी गोळ्या सुटल्या त्याच्या पिस्तुलातून,
हा काय त्याचा अपराध आहे ?
समोर आलात तुम्हीच निधड्या छ्यातीने
आणि शिकार झालात त्या..
निष्पाप बंदुकीच्या गोळ्यांचे.
आज त्याच निरागस हास्य,
तुम्हाला छद्मी वाटत.
अन त्याचे ते अश्रू म्हणजे
पश्याताप वाटतो तुम्हाला ?

पश्याताप कशाचा करायचा त्यानं,
गोळ्यांसमोर आलेल्या अन शहीद झालेल्या सैनिकांचा…
की त्याला शिकवल्या गेलेल्या जिहादचा ?
आत्ताच तर कुठे तो अक्षर गिरवतोय … त्याच्या धर्माचे.
दहशतवाद त्याचा धर्म आहे,
तो त्याचा धर्म पळतोय.
तुम्ही तुमचा धर्म पाळा.
विसरलात काय …..?
खुर्ची तुमचं मर्म अन
राजकारण तुमचा धर्म आहे.

जनतेचा विचार कसला करताय ?
जनतेला तर विस्मृतीचा शाप आहे.
अन इतिहास जमा गोष्टींवर
बोलणं सुद्धा इथ पाप आहे !
म्हणून तर …
उद्या, २६ /११ म्हणजे फक्त एक तारिक असेल,
अन कसाब तर कुणाच्या ध्यानात हि नसेल.

सोडून द्या त्या कसाबला,
तुमच्या साठी ते नवीन नाही.
सोडा जरूर सोडा …
पण सोडताना जनतेला तुमच्यात धरू नका
अन तुमच्या पळपुटेपणासाठी
गांधीवादाला बदनाम करू नका

ट्रेकर कसा ओळखावा

Filed under: General — marathisangrah @ 11:59 सकाळी

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा :-

१)शनिवार रविवार घरी आराम करायचं सोडून जो कष्ट करतो… तो ट्रेकर.

२)सोमवारी उशीरा कॉलेजला किंवा ऑफिसला येतो तो ट्रेकर…. सोमवारी दुपारनंतर सापडेल त्याला ट्रेकची माहिती आणि चढलेले आणि उतरलेले कडे, मधेच सापडलेला साप, त्याला परत जंगलात कसे सोडले, वाघाच्या पंजाचे ठसे दिसले पण वाघ नाही दिसला हे सांगत आजुबाजूच्या कन्यांचे लक्ष वेधू इच्छिणारा तो ट्रेकर….

यांना सिनेमाला नेले तरी करिष्मा कपूरकडे न बघता मागचे डोंगर कुठले आहेत…. नानाचा अंगठा कुठला, ढाकच्या बहिरीला जायला कुठे ट्रॅव्हर्स मारायला लागतो हे बघतात आणि दुसर्‍यांहे लक्ष करिष्मावरून विचलित करत बसतो… तो ट्रेकर.
 
LOL ………. गमतीचा  भाग सोड्ला तर ……….

१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काही ना काही कीडे केलेले असतात. त्यातही French beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या. काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)

२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)

३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टू म्हणतात. त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.

शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)

शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट …काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)

४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय …नाईलाजाने.

शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली … ही trek साठी भेटण्याची जागा.

शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand

शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह अन्य विशेष लकबी:हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसऱया club बरोबर ट्रेकला जातात :)

ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत …. साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात. कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो. पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूक नसते. रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)

बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी

यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .

६.खाण्या पिण्याच्या सवयी:

कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)

काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

खणखणित आवाजात पोवाडे गाणे

जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे

बैटिंग ला जाणे :) (बॅटिंग म्हणजे क्रिकेटमधील नाही. सक्काळी सक्काळी खुल्या आभाळी एखाद्या आडोशाच्या पिचवर जी होते ती.)

८.यांची दैवते:

off course शिवाजी महाराज

रायगडचा जगदीश्वर

हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .

९.यांची तिर्थस्थळे:

राजमाचीचा तलाव

बाण चा ब्लू लगून

नाणे घाटातील केव्ह

कोंकण कडा इ . इ .

आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज

यांना मुली आवडत नाहीत

स्वाइन फ्ल्यू…..

Filed under: Kavita — marathisangrah @ 11:54 सकाळी

पसरे तो अलगद…पसरे तो अलगद
न देता कुणाला कसलाच Clue,
Top Ten रेस मध्ये…
सगळ्यात आघाडीवर Swine Flu, Swine Flu

लक्षणे ही त्याची नीट ऐका,
येतो ताप, सततच्या शिंका
हळुहळु ओठही होतात Blue…
होतो जेव्हा हा Swine Flu, Swine Flu

शरीरातील शक्तीचा होतो रहास,
श्वास घ्यायला मग होतो त्रास
घशातील स्त्राव मग होतो Glue…
धोकादायक असा हा Swine Flu, Swine Flu

प्रतीबंधक म्हणुन उपाय करा साधे
संत्री – मोसंबी आणि भरपूर पाणी प्यावे,
सगळ्यात आधी गर्दीत जाणे टाळा…
एकदा Mask वापरल्यावर ताबडतोब जाळा

Mask वापरण्याची सध्या आली आहे लाट
२ रुपयांचे २० ला ऐकुन सगळे पडले चाट,
Mask लाऊन काही उपयोग फारसा नाही…
Doctorचा Feel घ्यायचा असल्यास लावायला हरकत नाही

जनतेमध्ये वाढत आहे उत्सुकता आणि भिती,
लागण झालेले रुग्ण नक्की आहेत तरी किती

कलीयुग माणसाला न जाणे काय काय दाखवणार आहे,
सरत्या काळासोबत आता…
प्राण्यांचे महत्व वाढणार आहे

यावर आहे एकच औषध…
नाव त्याचं Tamiflu,
सार्स, चिकुनगुण्याला डावलुन आला
Swine Flu, Swine Flu

07 Jul, 2008

Marketing

Filed under: Uncategorized — marathisangrah @ 4:45 pm

<a href=”httpMarketing

Haravala Aahe

Filed under: Kavita — marathisangrah @ 2:56 pm

Haravala aahe

02 May, 2008

Bevada

Filed under: Kavita — marathisangrah @ 7:48 pm

Photobucket

Bagh Tila Sangun

Filed under: Kavita — marathisangrah @ 7:41 pm

Photobucket
Photobucket
Photobucket

Bayako Cha Shlok

Filed under: Kavita — marathisangrah @ 7:32 pm

Photobucket

Kadhi Pahilay Tumhi!!

Filed under: Kavita — marathisangrah @ 7:24 pm

Photobucket

Next Page »

Theme: Rubric. Blog at WordPress.com.

Follow

Get every new post delivered to your Inbox.